कपालेश्वर महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:32 IST2019-08-22T23:36:16+5:302019-08-23T00:32:47+5:30

बागलाण तालुक्यातील कपालेश्वर येथील महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. तब्बल २४ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सुख-दु:खाची विचारपूस केली. तसेचदरवर्षी असा मेळावा घेण्याचा संकल्प सोडला.

Rangala Alumni Meet at Kapaleshwar College | कपालेश्वर महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थी मेळावा

कपालेश्वर महाविद्यालयात स्रेहमेळाव्याप्रसंगी जमलेले जे. एस. सोनवणे, माजी विद्यार्थी दादाजी शिंदे, अरुण सोनार, सुनीता पाटील, वर्षा सोनवणे, रत्ना शेवाळे, चंद्रकला भामरे, मनोहर ठाकरे, अर्जुन कापडणीस आदी.

जोरण : बागलाण तालुक्यातील कपालेश्वर येथील महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. तब्बल २४ वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या सुख-दु:खाची विचारपूस केली. तसेचदरवर्षी असा मेळावा घेण्याचा संकल्प सोडला. शिक्षक जयेश सोनवणे यांच्याकडे शाळा व आश्रमशाळेसाठी मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापक जे. एस. सोनवणे, माजी विद्यार्थी दादाजी शिंदे, अरुण सोनार , सुनीता पाटील, वर्षा सोनवणे, रत्ना शेवाळे, चंद्रकला भामरे, मनोहर ठाकरे, अर्जुन कापडणीस, गिरीधर बागुल, अनिता मोरे-काकुळते, वर्षा खैरनार, सुनील काकुळते, उदाराम सोनवणे, संजय काकुळते उपस्थित होते.

Web Title: Rangala Alumni Meet at Kapaleshwar College