शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

रामटेकडी वसाहत विविध समस्यांनी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:32 AM

सिंहस्थ कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या तपोवन परिसरातील रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना आजही बंद पथदीप, घंटागाडी, उघड्या गटारी, नदीपात्राची दुर्गंधी तसेच शौचालय अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल करत प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या नावाने खापर फोडले आहे.

पंचवटी : सिंहस्थ कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या तपोवन परिसरातील रामटेकडी वसाहतीतील नागरिकांना आजही बंद पथदीप, घंटागाडी, उघड्या गटारी, नदीपात्राची दुर्गंधी तसेच शौचालय अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल करत प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या नावाने खापर फोडले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नगरसेवक केवळ प्रचाराच्या वेळेसच आले मात्र त्यानंतर लोकप्रतिनिधी पुन्हा रामटेकडी वसाहतीत फिरकले नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासींनी केला आहे.रामटेकडी वसाहत सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपासून थाटली आहे. वसाहतीत जाणारे रस्ते काँक्रिटीकरण केलेले आहे. पथदीपदेखील बसविलेले आहेत. मात्र ड्रेनेज लाइन नसल्याने अनेकदा रस्त्यावर धुणी भांडी करताना सांडपाणीशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरासमोर वाहते. त्यामुळे वारंवार महिलांमध्ये भांडणे होतात. पथदीप बसविलेले असले तरी काही पथदीप बंद आहेत. अरुंद रस्ते असल्याने या भागात आत्तापर्यंत घंटागाडी आलेलीच नाही त्यामुळे नागरिकांना कचरा नदीपात्राकडे फेकावा लागतो अरुंद रस्ता असल्याने रामटेकडी भागात कचरा जमा करण्यासाठी तीनचाकी सायकल घंटागाडी सुरू केली पाहिजे.परिसरात एक ते दोन महिन्यांने औषध फवारणीसाठी कर्मचारी येतात मात्र ते कर्मचारी औषध फवारणी न करता केवळ नागरिकांच्या सह्या घेऊन जातात. परिसरातील नागरिकांसाठी सुलभ शौचालय असले तरी त्याची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. परिसरातील लोकसंख्या लक्षात घेऊन शौचालय संख्या वाढविणे गरजेचे आहे. परिसरातील सर्वच घराच्या छतावरून धोकेदायक ंवीजतारा गेल्याने पावसाळ्याच्या कालावधीत पत्र्यांच्या घरांमध्ये वीजप्रवाह उतरून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे या भागात ड्रेनेज लाइन असल्याने सांडपाणी तसेच पावसाळ्यात रस्त्याने वाहणारे पाणी कधीकधी नागरिकांच्या घरात जाते. त्यामुळे ड्रेनेज लाइन टाकणे गरजेचे आहे. याशिवाय रामटेकडी प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंत नसल्याने लहान मुले खेळताना खाली पडण्याची शक्यता आहे. वसाहतीला लागूनच नदीपात्र असल्याने अनेकदा या नदीपात्राची दुर्गंधी पसरते नियमित औषध फवारणी होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शौचालय संख्या अपुरी असल्याने तसेच साफसफाई होत नसल्याने लहान मुलांना तर कधी महिलांना उघड्यावरच जावे लागते.(उद्याच्या अंकात : इंदिरानगर झोपडपट्टी, कॅनलरोड, जेलरोड)

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक