पैठणीच्या राजवस्त्रावर राणाप्रताप यांची प्रतिकृती

By Admin | Updated: August 4, 2014 02:14 IST2014-08-03T20:15:53+5:302014-08-04T02:14:31+5:30

पैठणीच्या राजवस्त्रावर राणाप्रताप यांची प्रतिकृती

Rampratap's depiction of Paithani's vestiges | पैठणीच्या राजवस्त्रावर राणाप्रताप यांची प्रतिकृती

पैठणीच्या राजवस्त्रावर राणाप्रताप यांची प्रतिकृती

 

येवला : प्रस्तावित शाकंभरी हातमाग, हस्तकला विणकर औद्योगिक संस्थेचे संचालक (पैठणी विणकर) शरद वरोडे यांनी आपल्या प्रयत्नातुन हिंदुसुर्य
राणाप्रताप यांचे पैठणीच्या राजवस्त्रावर रेशमी धाग्यांनी धागा-धागा विणून प्रतिकृती प्रत्यक्ष हातमागावर विणली.
प्रत्यक्षात पैठणी वस्त्र विणकाम करणे हे मुळातच अवघड व बारीक कला-कुसरीचे काम समजले जाते. परंतु पिढ्यान-पिढ्या मिळालेल्या कलेच्या वारसामुळे हे शक्य झाल्याचे शरद वरोडे यांनी सांगितले. महाराणा प्रताप तसेच त्यांचा अश्व (घोडा) चेतक यांचे हुबेहुब चित्रण त्यांनी
केले. तसेच या अगोदरही त्यांनी विविध कलाकुसरची कामे हातमागावर चित्रित केलेले आहे. या कामास त्यांना शाकंभरी संस्था तसेच रवि वरोडे, राजु वरोडे यांचे सहकार्य लाभले. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पैठणी वस्त्रावर चित्र तयार करुन त्यांना ती पैठणी भेट देण्याचा मानस वरोडे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Rampratap's depiction of Paithani's vestiges