शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

‘रॅम’ : सायकल चळवळीतून पर्यावरण संवर्धनाच्या जागरसाठी नाशिकचे सायकलिस्ट आहेर दाम्पत्य करणार महाराष्ट्र भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 9:30 PM

पर्यावरणासाठी तसेच मानवी शरीरासाठी सायकल कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी हे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. ते २३ दिवसांच्या या भ्रमण यात्रेतून सायकल चळवळीचा प्रचार-प्रसाराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत.

ठळक मुद्देहे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. २३ दिवसांच्या या सायकल भ्रमण यात्रेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर

नाशिक : सायकल चळवळीचे माहेरघर म्हणून नवी ओळख प्राप्त करणाºया नाशिकमधील एक सायकलिस्ट दाम्पत्य २३ दिवसांची ‘रॅम’ अर्थात राईड अ‍ॅक्रॉस महाराष्ट्रच्या भ्रमंतीसाठी येत्या १ तारखेला सुरूवात करणार आहे. ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ असा संदेश हे सायकलिस्ट या भ्रमंतीमधून देणार आहे.नाशिकमधील रहिवासी असलेले प्रतीभा आहेर व देविदास आहेर हे दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून सायकलिंग करतात. ते नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशन या संस्थेचे सदस्य असून या अनोख्या ‘रॅम’ भ्रमंतीच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांमध्ये तसेच गावांमध्ये भेटी देत तेथील शाळा-महाविद्यालयांमध्ये हजेरी लावून सायकल-पर्यावरण यांचे समीकरण समजावून सांगणार आहे. पर्यावरणासाठी तसेच मानवी शरीरासाठी सायकल कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी हे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. ते २३ दिवसांच्या या भ्रमण यात्रेतून सायकल चळवळीचा प्रचार-प्रसाराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत. त्यांच्या या सायकल भ्रमण यात्रेत अष्टविनायक, साडेतीन शिक्तपीठे, साडेतीन गणपती शिक्तपीठे, खंडेराव जेजुरी, पंढरपूर, नांदेडचा गुरु द्वारा यासह महाराष्ट्रातील वीसपेक्षाही अधिक देवस्थानांना ते भेटी देत जागृती करणार आहेत. त्यांची ही सायकल भ्रमण यात्रेच्या वाटेत राज्यातील १९ जिल्हे येणार अूसन या जिल्ह्यांमधील सुमारे पन्नासपेक्षा अधिक शाळांमध्ये आहेर दाम्पत्य हजेरी लावून भावी पिढीचे सायकलविषयी प्रबोधन करणार आहेत. त्यांनी ही भ्रमण यात्रा नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांना समर्पित केल्याचे सांगितले आहे. देविदास आहेर हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांचे वय ४६ वर्षे तर त्यांच्या पत्नी प्रतिभा या ३६ वर्षीय सायकलपटू आहे. ते मागील आठ वर्षांपासून सायकलिंग करत असून त्अष्टविनायक साायकल यात्रा, पंढरपूर सायकलवारी, नाशिक पेलेटॉन स्पर्धा, नाशिक-त्र्यंबकेश्वर सायकल फे-या करण्याचा अनुभव यांच्या पाठीशी आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रenvironmentवातावरणSchoolशाळा