सिन्नर सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:21 IST2021-01-13T18:18:16+5:302021-01-13T18:21:32+5:30
सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सिन्नर सार्वजनिक वाचनालयात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात
याप्रसंगी मराठा सेवा संघाच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिका वाचनालयास भेट देण्यात आली. त्याचबरोबर गौरव काळुंगे या छोट्या मुलाने बिबट्याचा धाडसाने सामना केल्याबद्दल त्याचा माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक निर्मला खिंवसरा, सुजाता भगत, चंद्रशेखर कोरडे, जितेंद्र जगताप, संजय बर्वे, मनीष गुजराथी, दत्तात्रय वायचळे, हरिभाऊ तांबे, आनंदा सालमुठे, अनिता बागड, अजय शिंदे, अंबादास भालेराव, सचिन पांगारकर, विकास उकाडे, कविता काळे आदी उपस्थित होते.