राजधानी एक्स्प्रेस रोज धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:12 IST2021-01-15T21:03:55+5:302021-01-16T01:12:12+5:30

लासलगाव : नाशिकवरून मुंबई व दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस येत्या १९ जानेवारीपासून रोज धावणार असल्याने प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे.

The Rajdhani Express will run daily | राजधानी एक्स्प्रेस रोज धावणार

राजधानी एक्स्प्रेस रोज धावणार

जिल्ह्यातील यात्रेकरूंसह प्रवाशांची मुंबई व दिल्लीला जाणारी मध्य रेल्वेची राजधानी एक्स्प्रेस ही रोज सुरू व्हावी म्हणून अनेक दिवसांची मागणी होती. पहिल्यांदा राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून दोनच वेळेस नाशिकहून धावत होती. त्यानंतर खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी केलेल्या पत्रव्यवहारानंतर चार दिवस धावण्यास परवानगी मिळाली होती. तरीही ही एक्स्प्रेस आठवडाभर रोज धावावी म्हणून मागणी होत होती. पवार यांनीही त्याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सातत्याने मागणी लावून धरली. अखेर नाशिकवरून मुंबई व दिल्लीला जाणारी राजधानी एक्स्प्रेस आता १९ जानेवारीपासून रोज धावणार आहे.

Web Title: The Rajdhani Express will run daily