कैलास मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेचे राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:54 IST2018-12-22T00:53:38+5:302018-12-22T00:54:06+5:30

मखमलाबाद नाका येथील कैलास मित्रमंडळाच्या वतीने परिसरातील रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 Raj Thackeray's inauguration by Kailash Mitra Mandal Ambulance | कैलास मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेचे राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

कैलास मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेचे राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

पंचवटी: मखमलाबाद नाका येथील कैलास मित्रमंडळाच्या वतीने परिसरातील रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  नाशिक दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मखमलाबाद नाक्यावरील कैलास मित्रमंडळाला भेट दिली. यावेळी ठाकरे यांनी कैलास मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. यावेळी मनसे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास आमदार बाळा नांदगावकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, अनिल मटाले, डॉ. प्रदीप पवार, प्रभाग सभापती योगेश शेवरे, सलीम शेख, संजय बुटे, दिलीप खेडकर, संदीप भवर, दीपक चव्हाण, राहुल क्षीरसागर, प्रतीक गवळी आदी उपस्थित होते. दरम्यान, नाशिक दौºयावर आलेले ठाकरे हे नागरिकांशी सुसंवाद जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ठाकरे यांनी  केवळ रुग्णवाहिकेचे लोकार्पण केल्यानंतर अवघ्या काही वेळातच कार्यक्रमाच्या ठिकाणाहून काढता  पाय घेतला.

Web Title:  Raj Thackeray's inauguration by Kailash Mitra Mandal Ambulance