शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

राज हटले; दादा आले, कमळात अडकले ढिकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:56 IST

सत्ता नसेल तर मग राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता होणे स्वाभाविकच असते. पक्ष म्हणजे पक्षातील नेत्यांची प्रामुख्याने तशी तळमळ असतेच. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे तसेच होत आहे. पक्षाची ‘राज’कीय भूमिका कळेनासी झाली आहे.

नाशिक : सत्ता नसेल तर मग राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता होणे स्वाभाविकच असते. पक्ष म्हणजे पक्षातील नेत्यांची प्रामुख्याने तशी तळमळ असतेच. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे तसेच होत आहे. पक्षाची ‘राज’कीय भूमिका कळेनासी झाली आहे. कधी आघाडीबरोबर तर कधी विरोधात तर कधी निवडणूक लढायचीच नाही, असा अवघा गोंधळ आहे. अशावेळी शिलेदारांची कोंडी होणे स्वाभाविकच आहे. विशेषत: निवडणुकांसाठी बाहू स्फुरण पावणारे मग मल्लच असतील आणि त्यांचे शड्डू ठोकून झाले असेल तर मग काय करणार, लढायचेच ठरले तर आखाडा बदलणारच की!पंचवटीकर ढिकले यांचेच बघा ना शड्डू ठोकले खरे, परंतु पक्षाची भूमिकाच कळेना. अखेरीस त्यांनी आखाडा बदलायचे ठरवले आणि वस्तादही. त्यामुळे त्यांच्या पोस्टर बॅनरवरून राज ठाकरे यांच्या छबीही अचानक हटल्या आणि तशी कुजबुजही सुरू झाली आहे.सुरुवातीला सारेच अशा गोष्टींचा इन्कार करतात. तसे मराठी हृदयसम्राटांचे (सध्या तरी) शिलेदार असलेले राहुल ढिकले नाकारतीलही. हा राईचा पर्वत आहे, असे म्हणतील; परंतु राईचा पर्वत होण्यासाठी मुळातच राई म्हणजे असतेच ना...! तर सध्या अशाच प्रकारची चर्चा जोर धरत असून, राज ठाकरे यांच्या ज्या पद्धतीने निवडणूक न लढविण्याचे संकेत मिळत आहेत आणि भाजपा ज्या पद्धतीने अन्य पक्षांतील शिलेदार आपल्याकडे सामावून घेत आहेत, ते बघता असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात बाळासाहेब काय म्हणतात आणि वसंतराव काय ‘गीत’ गातील हा पुन्हा वेगळा विषय... त्यातच (कै.) उत्तमराव ढिकले यांनीदेखील कोणत्याही पक्षाला जवळ करण्यास कधीच संकोच केला नाही तेथे राहुल यांनी तरी का तमा बाळगायची?या मतदारसंघात तसे तर भाजपाचे विद्यमान उमेदवार बाळासाहेब सानप प्रमुख दावेदार आहेत. परंतु भाजपात काय होईल सांगता येत नाही. विशेषत: चंद्रकांतदादा पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि वातावरण बदलले गेले. दादांच्या आशीर्वादाने भाजपात अनेक बदल होऊ लागले आहेत आणि त्याच दादांच्या आशीर्वादाने अनेक बदल संभवत असल्याची चर्चा आहे. त्यातूनच मग राहुल ढिकले यांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली.मनसे म्हटले की नाशिक हे सात वर्षांपूर्वीचे समीकरण तसे केव्हाच संपले आहे. आजही हा पक्ष मोजक्याच हातांवर टिकून आहे. त्यात राहुल ढिकले यांचा समावेश आहे, परंतु राजकारणात महत्त्वाकांक्षेशिवाय नेते टिकत नाही. राहुल यांची सुप्त इच्छा कालांतराने उघड झाली आणि त्यांचे पिताश्री (कै.) उत्तमराव ढिकले यांनी ज्या पूर्व नाशिक मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले त्यावरच ढिकले यांनी दावा केला. विधानसभेच्या निवडणुका तशा तर जाहीर होण्यास अवकाश असतानाच राहुल ढिकले यांना घुमारे फुटले. त्यांच्या आणि राज यांच्या छबी असलेली पोस्टर्स पंचवटीतील रिक्षांवर दिसू लागली. परंतु गेल्या पंधरवड्यापासून अचानकच ढिकले यांच्या पोस्टरवरून राजकीय पितृतीर्थ गायब झाले आणि (कै.) उत्तमदादा ढिकले यांच्या आशीर्वादाचे फलक दिसू लागले. आता चंद्रकांत दादांच्या छबी कधी दिसतील, अशीदेखील कुजबुज सध्या सुरू आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक