पावसाच्या सरींनी नाशिककरांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:43 IST2018-06-17T00:43:55+5:302018-06-17T00:43:55+5:30
नैऋ त्य मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडलेली असताना शनिवारी (दि.१६) सायंकाळी शहरातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला असून, राज्यात लांबलेला मान्सून सक्रिय होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

पावसाच्या सरींनी नाशिककरांना दिलासा
नाशिक : नैऋ त्य मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडलेली असताना शनिवारी (दि.१६) सायंकाळी शहरातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला असून, राज्यात लांबलेला मान्सून सक्रिय होण्याचे संकेत दिसून येत आहेत. प्रखर उन्हाळा सहन केल्यानंतर नाशिककरांना लागलेली मान्सूनची प्रतीक्षा प्रशांत महासागराच्या पश्चिम नैऋ त्य भागात चक्र ीवादळे तयार झाली होती. या वादळांच्या प्रभावाने मान्सूनचे आगमन लांबल्याने तपमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. परंतु शनिवारी सायंकाळी शहरातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा पसरला असून, नाशिककरांनी या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. वादळाच्या प्रभावामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांतून ताशी १५ ते २० किमी वेगाने पश्चिमेकडून पूर्वेकडे तसे वारे वाहत असून, सर्व बाष्पयुक्त ढग भूखंडावरून वाहून जात असताना यातील काही ढग शनिवारी नाशिकमध्ये बरसले.