शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 21:12 IST

वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात रविवारी (दि.११) अचानकच पावसाने हजेरी लावून अवघ्या जिल्ह्याला ओलेचिंब करून टाकले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देवादळीवाऱ्यासह बरसला : रब्बी पिकांना काही प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वादळीवाऱ्यासह जिल्ह्यात रविवारी (दि.११) अचानकच पावसाने हजेरी लावून अवघ्या जिल्ह्याला ओलेचिंब करून टाकले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे क्षुल्लक सोडून मोठ्या नुकसानाची माहिती नाही. तर काही प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान होणार असल्याचे कळते.मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणावरून पाऊस येणार अशी शक्यता दिसून येत होती. त्यात रविवारी (दि.११) दुपारपर्यंत खुल्या वातावरणात अचानकच ढग दाटून आले व दुपारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाने हजेरी लावली असल्याची माहिती आहे.वादळीवाऱ्यासह अचानकच बरसलेल्या या पावसामुळे पावसाळाच सुरू झाल्यासारखे वाटू लागले. या पावसामुळे कोठेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र चना, लाखोळी, तुर सारख्या रब्बी पिकांना काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.करटी बु. येथे घराचे छत पडलेरविवारच्या वादळी पावसामुळे तिरोडा तालुक्यातील ग्राम करटी बु. येथील प्यारेलाल लहुजी कटरे यांच्या घराचे छत पडले. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत अन्य काही हाणी झाली नाही.गोंदियात होर्डींग्स पडलेवादळीवाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डींग्स पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. कित्येक भागातील होर्डींग्स वादळीवाऱ्यामुळे फाडल्याचेही दिसले.कार्यक्रमांचे मंडप उडालेसध्या लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्न कार्य सुरू आहे. वादळीवाऱ्यामुळे अर्जुनी-मोरगाव येथे लग्नाचे मंडप उडाल्याचे व पडल्याचे प्रकार घडले. यामुळे कार्यक्रमात अव्यवस्था निर्माण झाली.पावसामुळे थंडीचा जोर वाढलामागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला होता व उन्हाचे चटके जाणवत होते. त्यामुळे दिवसा पंखा सुरू करण्याची पाळी आली होती. शिवाय गरम कापडांची गरज भासत नव्हती. मात्र रविवारी अचानकच बरसलेल्या अवकाळी पावसामुळे गेलेली थंडी परतून आली व थंडीचा जोर वाढला. पावसामुळे वाढलेल्या थंडीला बघता पुन्हा गरम कपडे काढण्याची पाळी आली. मात्र या बदलत्या वातावरणाचा आरोग्य परिणाम जाणवतो.

टॅग्स :Rainपाऊस