त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस; शेतकरी राजाच्या अडचणीत भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 19:08 IST2021-11-05T19:07:34+5:302021-11-05T19:08:41+5:30
वेळुंजे परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजाच्या अडचणीत भर पडली आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस; शेतकरी राजाच्या अडचणीत भर
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : तालुक्यातील वेळुंजे परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजाच्या अडचणीत भर पडली आहे. सद्या भाताच्या शेतीची कापणी चालू असताना अचानक पणे पावसाने जोर धरल्यामुळे शेतातुन धान्य बाहेर काढताना शेतकऱ्यांची दमछाक पाहायला मिळाली.
या पावसाने आलेले पीक खडून जाण्याची भिती शेतकरी वर्गाने बोलून दाखवली , तसेच भात कापणीसाठी हार्वेस्टर मशीन ही जमीनित घुसणार नाही आणि मजूर ही परवडणार नसल्याने हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची डोकदुखी ठरणार आहे. यावेळी अंबोली , वेळुंजे, शिरसगाव, विनायक नगर, गणेशगाव(वा) , गोरठाण, वाघेरा, माळेगाव, ब्राह्मणवाडे, धुमोडी परिसरात विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.