पावसाची उघडीप

By Admin | Updated: August 2, 2014 01:22 IST2014-08-01T22:57:43+5:302014-08-02T01:22:29+5:30

दिवसभरात ३०४ मिमीची नोंद

Rain open | पावसाची उघडीप

पावसाची उघडीप

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी (दि. १) उघडीप दिल्याचे चित्र होते. नाशिककरांना काही वेळ सूर्यदर्शनही झाले. शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३०४ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली.
गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपले होते. त्यातही मालेगाव, नांदगाव व येवला परिसरात पावसाची तुरळक हजेरी होती. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र होते. दुपारी काही वेळ सूर्यदर्शनही झाले. सायंकाळी मात्र अधूनमधून तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविण्यात आलेली पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : नाशिक- ३४.४, इगतपुरी- ८९, दिंडोरी- ०७, पेठ- १८, त्र्यंबकेश्वर- ५३, मालेगाव- ०४, नांदगाव- ००, चांदवड- १.६, कळवण- ३२.६, बागलाण- ५.८, सुरगाणा- ३५, देवळा- ०.२, निफाड- १.६, सिन्नर- ९, येवला- १३ असा एकूण ३०४.२. मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा ७८ ते ७९ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rain open