शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले.

By admin | Updated: November 17, 2014 00:34 IST

पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले.

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या पावसाने आज रविवारी रौद्रावतार धारण करीत शहराला तडाखा दिला. सायंकाळी मुसळधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले. दीड तासात तब्बल ३९.२ मि.मी. पाऊस झाला. या पावसाने ठिकठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले होते. त्यामुळे रविवारच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे अतोनात हाल झाले. बाजारपेठेत नागरिक तसेच वाहने अडकून पडल्याने जणू शहर ठप्प झाल्याचे चित्र होते. वातावरणात बदल झाल्याने दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून, पाऊसही हजेरी लावत आहे; मात्र आज सायंकाळी साडेपाचला शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एवढा होता की, समोरचे दृश्यही दिसत नव्हते. पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. त्यातच जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले. रविवार असल्याने शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या मेनरोड, दहीपूल परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र सखल भाग असल्याने तेथे थोड्याच वेळात गुडघ्याएवढे पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना आहे त्या दुकानातच थांबून राहावे लागले. काही ठिकाणी रस्त्यावरील ढापे उघडून दिल्याने त्यात पाय अडकण्याच्या भीतीने नागरिक रस्त्यावरून चालणेही टाळत होते. पाण्याच्या लोंढ्यामुळे नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहनेही अडकून पडली. सुमारे दीड तास धुवाधार पाऊस कोसळत होता; अनेक अडकलेल्या महिलांनी अखेर एकमेकींच्या आधाराने पाण्यातून वाट काढली. दरम्यान, पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. साधारणत: २४ तासांत ६५ मि.मी. पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी मानली जाते. शहरात अवघ्या दीडच तासात ३९.२ मि.मी. पाऊस झाल्याने ही एकप्रकारे अतिवृष्टीच होती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)