रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:51 IST2020-11-25T00:49:58+5:302020-11-25T00:51:52+5:30
इगतपुरी- मनमाड रेल्वे रुळालगत रेल्वेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेले अतिक्रमण रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात काढून टाकण्यात आले.

रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण जमीनदोस्त
देवळाली कॅम्प : इगतपुरी- मनमाड रेल्वे रुळालगत रेल्वेच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आलेले अतिक्रमण रेल्वे प्रशासनाकडून सोमवारी रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात काढून टाकण्यात आले.
भगूरमध्ये रेल्वे प्रशासनाने खंडेराव मंदिराजवळील व रेल्वे ट्रॅकच्या बाजूकडील जागेवर गेल्या अनेक वर्षांपूर्वी नागरिकांनी पक्के घरे बांधली होती. अलीकडेच इगतपुरी ते मनमाड रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्याचे घाटत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने सन २०१८ व २०२० मध्ये अतिक्रमण केलेल्या नागरिकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सोमवारी रेल्वेचे इंजिनियर वैकुंठ सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जेसिबीच्या सहाय्याने २५ घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी रेल्वे पोलीस बळाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरसिंह गुहिलोत, हवालदार विकास नागरे, हवालदार नदिम सय्यद यांनी बंदोबस्त ठेवला होता.