सातपूरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:36 AM2018-09-10T00:36:53+5:302018-09-10T00:37:20+5:30

शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले

Raids on gambling bases of Satpur | सातपूरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

सातपूरमधील जुगार अड्ड्यांवर छापे

Next

नाशिक : शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़
पाथर्डी फाट्यावरील नर्सरीच्या पत्र्याच्या शेडजवळ जुगार सुरू असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांनी मिळाली होती़ त्यानुसार छापा टाकला असता संशयित फिरोज शाबीराबी शेख, विकास जगन्नाथ पराते व त्यांचा एक साथीदार हे कल्याण मटका जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
दुसरा छापा सातपूर पोलिसांनी औद्योगिक वसाहतीत टाकला़ याठिकाणी संशयित नितीन जाधव व त्याचे दोन साथीदार पत्यांच्या कॅटवर जुगार खेळत होते़
अंबडला तरुणीचा विनयभंग
नाशिक अनधिकृतपणे तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुल नंदू वाघ (रा.नाशिकरोड) या संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Raids on gambling bases of Satpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.