शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

घोटेवाडी येथे अवैध दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:05 IST

सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी येथे अवैध दारु अड्ड्यावर महसूलच्या पथकाने धाड टाकून दारु विक्रेत्यास १० हजारांचा दंड ठोठावल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.

सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी येथे अवैध दारु अड्ड्यावर महसूलच्या पथकाने धाड टाकून दारु विक्रेत्यास १० हजारांचा दंड ठोठावल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. महसूल पथकाने वावी पोलिसांना या कारवाईची माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोलिस पथक पाठवून दारु विक्रेत्याकडील मुद्देमाल जप्त करीत त्याच्यावर अवैध दारु बाळगुन त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.घोटेवाडी येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून गेल्या १३ दिवसात ६ जणांचा बळी गेला आहे. तर २० रुग्ण बाधीत असून गावात आणखीही अनेकजणांना या आजाराची लक्षणे दिसून येत आहे. अशा बिकट परिस्थितीत येथील अवैध दारु अड्ड्यावर परिसरातील गावांच्या रहिवांशांची दारु घेण्यासाठी होणारी गर्दी कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याची तक्रार तहसीलदार राहूल कोताडे आणि वावी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने केली होती. बुधवारी सदर अवैध दारु अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी धाडले असता तेथे अवैध दारु विक्री सुरु असल्याचे दिसून आले. नायब तहसीलदार ललिता साबळे यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या बिटचे हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप, भास्कर जाधव, गोविंद सुरेवाड यांना घटनास्थळी पाठवले. कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करुन अवैधरित्या दारु विक्री केल्याप्रकरणी सदर दारु विक्रेता भाऊराव रामचंद्र सरोदे (३६) यास १० हजारांचा दंड ठोठावला. दरम्यान, वावी पोलिसांनी मुद्दे माल जप्त केला असून अवैध दारु बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक