स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
By संजय पाठक | Updated: July 24, 2025 19:50 IST2025-07-24T19:49:50+5:302025-07-24T19:50:50+5:30
Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथीत अवमानकारक विधान केल्या प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी नाशिकच्या न्यायालयात दूरदृष्यप्रणालीव्दारे हजेरी लावली त्यानंतर हा जामिन मंजूर करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
- संजय पाठक
नाशिक - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथीत अवमानकारक विधान केल्या प्रकरणी नाशिकच्यान्यायालयाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी नाशिकच्या न्यायालयात दूरदृष्यप्रणालीव्दारे हजेरी लावली त्यानंतर हा जामिन मंजूर करण्यात आला.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढल्यानंतर हिंगोली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी सरकारची माफी मागितली आणि ते सरकारकडून आर्थिक मदत घेत होते अशी टीका त्यांनी केली होती. यासंदर्भात नाशिक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी देवेंद्र भुतडा यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्या मार्फत नाशिकच्या न्यायालयात सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी कलम ५०० आणि ५०४ अन्वये दावा दाखल केला होता. सहदिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर नरवाडीया यांच्या समोर त्यांची आज सुनावणी झाली. यावेळी दूरदृष्यप्रणालीव्दारे राहुल गांधी हजर राहीले त्यांनी आपल्याला आरोप कबुल नसल्याचे सांगितले. परंतु त्यांचा जामिन अर्ज मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. जयंत जायभावे यांनी बाजू मांडली.