रब्बी पिकांना नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:41 PM2020-01-17T22:41:19+5:302020-01-18T01:11:23+5:30

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

Rabbi crops newborn! | रब्बी पिकांना नवसंजीवनी!

तोडणीला आलेली द्राक्षबाग कडाक्याच्या थंडीने खराब होण्याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देकुठे हर्ष कुठे चिंता : येवला तालुक्यात शेतकामांना वेग; थंडीने द्राक्षबागा धोक्यात

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक , मानोरी खुर्द, शिरसगाव लौकी, नेऊरगाव, जळगाव नेउर, मुखेड आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड झाली असून, अनेक ठिकाणी पुढील दहा ते बारा दिवसांत द्राक्षतोडणीस सुरु वात होणार आहे. फळतोडणीस आल्याने व्यापारी वर्गाकडून द्राक्षांचे दर ठरविणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अचानक थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने द्राक्षबागेला धोका निर्माण झाला आहे. पहाटे दवबिंदूदेखील जास्त प्रमाणात पडत असून, हे दवबिंदू द्राक्षफळावर जास्त वेळ साचून राहत असल्याने द्राक्षफळ खराब होण्याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.
रब्बी हंगामातील उन्हाळ कांदे, गहू , हरभरा, ज्वारी आदी पिकांना ही थंडी लाभदायी असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात सातत्याने बदल झाल्याने रब्बी पिके आणि द्राक्षबागा संकटात सापडलेल्या होत्या. त्यामुळे जवळपास महिनाभर रब्बी हंगामातील पिकांवर आणि द्राक्षबागेवर औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर ओढवली होती. वातावरण बदलामुळे औषध फवारणी खर्चात भरसमसाठ वाढ झाली असून, त्यात ऐन द्राक्षतोडणीला थंडीची लाट तीव्र असल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी चिंता व्यक्त होत आहे.

बागा वाचवण्यासाठी लाखोंचा खर्च
मागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळी स्थितीत अनेक शेतकºयांनी कुºहाड चालवत द्राक्षबागा भुईसपाट केल्या होत्या. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने शेतकरीवर्गाने द्राक्षबागा पुन्हा फुलवल्या आहेत. वर्षातून एकदाच बागेतून उत्पादन निघत असल्याने बाग जगविण्यासाठी लाखो रु पयांचा खर्च येत असतो. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने औषध फवारणी करून द्राक्षबागा वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. मात्र, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे बोलले जात असल्याने याचा परिणाम द्राक्षमण्यांवर होणार आहे. यामुळे द्राक्षाच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेकोट्या पेटू लागल्या
थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. संध्याकाळी सहा वाजेपासून तरुण, आबालवृद्ध शेकोटीभोवती बसून गप्पा मारताना दिसत आहे. बाजारामध्ये उबदार कपडे मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल झाले आहे. मागणी असल्याने महागड्या दराने उबदार कपड्यांची विक्री होत आहे. थंडीने रु ग्णसंख्येत वाढ झाली असून, दवाखान्यात गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Rabbi crops newborn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.