वडाळानाका रस्त्यावर नादुरु स्त वाहनांची रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:04 IST2020-07-20T22:19:12+5:302020-07-21T02:04:56+5:30
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की नादुरु स्त वाहनांसाठी? असा उपरोधक प्रश्न नागरिकांनी केला आहे.

वडाळानाका रस्त्यावर नादुरु स्त वाहनांची रांग
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी दरम्यान नासर्डी नदी ते वडाळानाका या रस्त्यावर नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. रस्ता वाहतुकीसाठी आहे की नादुरु स्त वाहनांसाठी? असा उपरोधक प्रश्न नागरिकांनी केला आहे.
सुमारे ११ वर्षांपूर्वी वडाळानाका ते पाथर्डीगावात लाखो रु पये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला. वाहनांवर नियंत्रण राहावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्याचे सुशोभिकरण करण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आले. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, परबनगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी, सराफनगर, शरयूनगरीसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे आणि अंबड औद्योगिक वसाहत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु नासर्डी नदी पूल ते वडाळानाका रस्त्याच्या दरम्यान अनेक दिवसांपासून चारचाकी नादुरु स्त वाहने पडून असल्याने वाहतुकीचा रस्ता अरु ंद पडत आहे. यामुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात घडत आहे. संबंधित विभागास तक्र ार करून सुद्धा अद्यापही अद्यापही कारवाई झाली नाही. रस्त्यावर पडून असलेले नादुरु स्त वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.