शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्याचा प्रश्न कामगार आयुक्तालयात

By admin | Updated: July 30, 2014 00:18 IST

महापालिका कामगार : उद्या पुन्हा सुनावणी

नाशिक : मार्चअखेरीस मालमत्ताधारकांकडून थकबाकी वसुली करण्यासाठी आणि विविध कामांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी कराव्या लागणाऱ्या जादा कामाचा मोबदलाच न मिळाल्याने तो मिळण्याची केस थेट कामगार आयुक्तालयात गेली असून, ३१ रोजी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. यासाठी उपस्थित राहण्याची सूचना प्रशासकीय उपआयुक्तांना करण्यात आली आहे. महापालिकेत एलबीटी लागू झाल्यापासून उत्पन्न घटले आहे. उत्पन्न वाढण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवित असते. पालिकेला मिळणारे विविध कर हे त्यातील महत्त्वाचे उत्पन्न होय. त्याची वसुली करणे हेच महापालिकेसमोरील आव्हान असते. यासाठी कर्मचाऱ्यांना घरोघरी भेटी देत कर भरण्याचे आवाहनही करावे लागते. यासाठी अनेक कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करून त्यांना सुटीच्या दिवशी काम करण्याची सक्ती केली जाते. दरवर्षी मार्च महिन्यात यासाठी अनेक विभागांतील कर्मचारी साप्ताहिक आणि शासकीय सुटी न घेता काम करीत असतात. त्यापोटी त्यांना जादा कामाचा मोबदला मिळावा हा त्यांचा हक्कअसून, महापालिकेने त्यांना दोन वर्षांपासून वंचित ठेवल्याचा आरोप सेवास्तंभ या कर्मचारी संघटनेने केला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा संदर्भ देत सेवास्तंभ संघटनेने कामगार आयुक्तालयात धाव घेतली होती. त्याचा संदर्भ घेत कामगार उपआयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दि. २३ जून आणि १७ आॅगस्ट रोजी पाचारण केले होते. पहिल्या तारखेस सहायक उपआयुक्त नितीन नेरे उपस्थित होते. दुसऱ्या सुनावणीस मनपा उपआयुक्त गैरहजर राहिल्याने उद्या दि. ३१ रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याचे पालिकेला कळविण्यात आले आहे. या प्रकरणी सुनावणीसाठी प्रशासकीय उपआयुक्तांनी उपस्थित राहण्याची सूचना कामगार उपआयुक्तांनी केली आहे. आता तरी न्याय मिळेल, या अपेक्षेत कर्मचारी आहेत. (प्रतिनिधी)