सिन्नरजवळ दोन मित्रांवर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 01:17 IST2021-09-23T01:17:01+5:302021-09-23T01:17:25+5:30

सिन्नरजवळ अज्ञात वाहनाने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जुन्या केला कंपनीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे.

Put the time on two friends near Sinnar | सिन्नरजवळ दोन मित्रांवर काळाचा घाला

सिन्नरजवळ दोन मित्रांवर काळाचा घाला

ठळक मुद्देसिन्नर-शिर्डी रस्ता : पल्सरला अज्ञात वाहनाची जोरदार धडक

सिन्नर : महामार्गावर सिन्नरजवळ अज्ञात वाहनाने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जुन्या केला कंपनीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे.

सचिन त्र्यंबक चकोर (२८, रा. संजीवनीनगर, सिन्नर) व शिवम पांडुरंग गिते (१८, रा. ढोकेनगर, सिन्नर) हे दोघे मित्र त्यांच्या पल्सर दुचाकी (एम. एच. १५ एफ. डब्लू. ७८६२)ने मुसळगावाकडून सिन्नरकडे येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title: Put the time on two friends near Sinnar