पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:00 IST2018-10-13T00:59:14+5:302018-10-13T01:00:30+5:30

जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या दोघा संशयितांना हटकणाºया पोलीस कर्मचाºयास धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़

Push the police officer | पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

नाशिक : जिल्हा रुग्णालयासमोर एकास मारहाण करीत असलेल्या दोघा संशयितांना हटकणाºया पोलीस कर्मचाºयास धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी संशयित रवि भरत वाघमारे (३२, रा. हॉटेल राजदूतजवळ, त्र्यंबकरोड), सचिन रमेश सोनवणे (३०, रा. देवळाली गाव) या दोघांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे आरटीपीसी ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई योगेश परदेशी हे जिल्हा रुग्णालयाच्या गेटसमोरून जात होते़ यावेळी सातपूरच्या वडारवाडी येथील विजय देवकर या युवकास संशयित वाघमारे व सोनवणे हे मारहाण करीत होते़ यावेळी परदेशी यांनी गाडी थांबवून संशयितांना समजावून सांगून पोलीस ठाण्यात चला, असे
सांगितले़ यावेळी संशयितांनी तुझा काही संबंध नाही़ याने माझ्या वडिलांना मारले आहे़ कायदा आम्हाला पण कळतो असे म्हणून परदेशी यांची गच्ची पकडून धक्काबुक्की केली तसेच बघून घेऊ, अशी धमकी दिली़
याप्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी संशयितांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे़

Web Title: Push the police officer