आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:30 IST2018-12-25T18:30:22+5:302018-12-25T18:30:48+5:30
मुंढेगाव ता. इगतपुरी येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील झायलम वॉटर मार्क कंपनीने लाखो रुपये किमतीची ही मदत आश्रमशाळेला दिली.

मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा करणार्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मान्यवर.
घोटी : मुंढेगाव ता. इगतपुरी येथील इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेत शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील झायलम वॉटर मार्क कंपनीने लाखो रुपये किमतीची ही मदत आश्रमशाळेला दिली. जिल्ह्यात परदेशी कंपनीने भरीव मदत दिलेली ही पहिली शाळा आहे. दरतासी १ हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार्या यंत्राचा शुभारंभ आज करण्यात आला.
निवासी आश्रमशाळेला शुद्ध पाणी आवश्यक आहे. शाळेत३५८ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी रोज २ हजार लिटर पाणी आवश्यक असते. प्लॅनेट वॉटरच्या एक्वा वॉटर प्रणाली स्थापना, जल, आरोग्य आणि स्वच्छता शिक्षण कार्यक्र मांतर्गत या आश्रमशाळेत एका तासाला १ हजार लिटर शुद्ध पाणी देणाऱ्या शुद्धीकरण यंत्राचे आज हस्तांतरण करण्यात आले. अमेरिकेतील झायलम वॉटर मार्क कंपनीच्या मार्फत कायरस तारापुरे यांनी यासाठी आश्रमशाळेला ही लाखो रु पयांची मदत दिली. ५ वर्षासाठी या अत्याधुनिक यंत्रसामग्रीची देखभाल दुरु स्ती आणि शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी या कंपनीने घेतली आहे. नाशिकच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात आला. याप्रसंगीप्रशांत देशपाडे यांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक किशोर पगारे यांच्याकडे हा प्रकल्प हस्तांतरित केला.