शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नववर्षानिमित्त रंगला कलाविष्काराचा कुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 01:02 IST

शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्य क्षेत्रातील आचार्यांसह त्यांचे विद्यारत शिष्य अशा सुमारे एक हजार कलाकारांनी एकत्रित सांस्कृतिक सोहळा साजरा केला.

नाशिक : शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्य क्षेत्रातील आचार्यांसह त्यांचे विद्यारत शिष्य अशा सुमारे एक हजार कलाकारांनी एकत्रित सांस्कृतिक सोहळा साजरा केला.आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विकास मंडळाच्या नववर्ष स्वागत समितीतर्फे हिंदू चंद्र नववर्षानिमित्त ‘अंतर्नाद’ सोहळ्यात स्वर, ताल नृत्याच्या संगमातून आहद आणि अनाहदच्या सुंदर मिलाफाची अनुभूती मिळविण्याची संधी नाशिककरांना मिळाली. प्रारंभी लहान गटातील कलाकारांनी अलापी गायनाविष्कारात गुरुवंदना सादर केली. त्यानंतर राग यमनमधील गायनाविष्कारासह तबला व सिंथेसायझरसोबतच ध्वनीमुद्रित संगीतावर कथ्थक नांंदी व भरतनाट्यममधील प्रणम्य सिरसा देवम नृत्याविष्कार, राग वृंदावनी सारंगमध्ये बासरीवादनासह तबल्याची साथसंगत केली.सांस्कृतिक सोहळ्याने गोदाघाटावर रंगला ‘अंतर्नाद’तबला, बासरी, सिंथेसायझर, व्हायोलिन, हार्मोनियमच्या साथीने भरतनाट्यम, कथ्थक व भजनांद्वारे अलापी, तराना, मालकंस, केदार आदी शास्त्रीय रागांतील बंदिशींच्या सादरीकरणातून सोमवारी (दि.१) गोदाकाठावर अनोख्या कलाविष्काराचा कुंभ रंगला. हा सोहळा पाहण्यासाठी गोदाघाटावर गर्दी झाली होती.बासरीवादनात तराना सादर करताना राग भूपमधील त्रितालासह विविध बंदिशींचे गायन, कथक, भरतनाट्यमच्या नृत्याविष्कारानंतर कथक व तबल्याची जुगलबंदी अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळाली. अखेरच्या सत्रात श्री रामचंद्र कृपाळू भजमन, पायोजी मैंने राम रतन धन पायो व अगा वैकुंठीचा राया या भजनांसह विठ्ठल गजराने अंतर्नाद सोहळा रंगला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक