‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:18 IST2019-08-10T00:14:04+5:302019-08-10T00:18:38+5:30

बॅलेट पेपर आणा, लोकशाही वाचवा, वाचवा रे वाचवा लोकशाही वाचवा अशा घोषणा देत विरोधी पक्षांनी आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि.९) निदर्शने केली.

Protests on behalf of opposition parties against 'EVM' | ‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांच्या वतीने निदर्शने

‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांच्या वतीने निदर्शने

नाशिक : बॅलेट पेपर आणा, लोकशाही वाचवा, वाचवा रे वाचवा लोकशाही वाचवा अशा घोषणा देत विरोधी पक्षांनी आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि.९) निदर्शने केली. यावेळी ईव्हीएम हटवा देश वाचवा, बॅलेट पेपर आणा लोकशाही वाचवा असे फलक झळकावले. यावेळी झालेल्या आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, रंजन ठाकरे, शाहू खैरे, वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, बबलू खैरे, कॉ. राजू देसले, सचिन मालेगावकर यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

Web Title: Protests on behalf of opposition parties against 'EVM'