शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CAA: नाशिकच्या ईदगाह मैदानावरून सीएए, एनआरसीविरूध्द ‘एल्गार’

By अझहर शेख | Published: December 22, 2019 4:59 PM

सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकणार नाही. सर्व गोरगरीब लोकांवर अन्याय होणार आहे. ही लढाई केवळ मुस्लिमांची नाही तर सर्व धर्मियांची आहे...

ठळक मुद्देइदगाहवर सुमारे पाच हजार नागरिकांनी उपस्थितीधर्मग्रंथ कुराणमधील श्लोक पठणसीएए कायदा व एनआरसी सरकारने रद्द करावा

नाशिक : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) व एनआरसीविरोधात शहरातील मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर एकत्र येत सरकारचा निषेध करीत रविवारी (दि.२२) जाहीर सभेतून शांततेत लोकशाही मार्गाने हल्लाबोल केला. भारतीय संविधानविरोधी या कायद्याची या धर्मनिरपेक्ष देशात गरज नाही, यामुळे तत्काळ सीएए कायदा व एनआरसीची प्रक्रिया सरकारने रद्द करण्याची घोषणा करत देशाची एकता व अखंडता जोपासावी, असा सूर या जाहीर सभेतून उमटला.नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला देशभरातून कडाडून विरोध होत असताना नाशिकमधूनदेखील जोरदार विरोध होताना दिसून येत आहे. गेल्या गुरूवारी संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येत शहरातून मोर्चा काढला होता. या मोर्चाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर रविवारी मुस्लीम समुदायाच्या वतीने सीएए कायद्याविरूध्द बोलविलेल्या जाहीर निषेध सभेत इदगाह मैदानावर सुमारे पाच हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे पोलीस प्रशासनाच्या विशेष शाखेच्या सुत्रांनी सांगितले.शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सुन्नी मरकजी सिरत समिती, रजा अकादमी, नुरी अकादमी, सुन्नी दावत-ए-इस्लामी, दावत-ए-इस्लामी यांसारख्या धार्मिक संघटनांसह जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प आदि भागातील मुस्लीम युवक मित्रमंडळांनी पुढाकार घेत ईदगाह मैदानावरील सभा आयोजित केली. या सभेसाठी शहरातील मुस्लीम बहुल भागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. ईदगाह मैदानावर सकाळी साडेदहा वाजेपासून लोक जमण्यास सुरूवात झाली. अकरा वाजेच्या सुमारास निषेध सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने तुडूंभ भरले होते. ईदगाहच्या विचारमंचावर शहर-ए-काजी सय्यद मोईजोद्दीन, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलाना मुफ्ती महेबुब आलम, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, मौलाना मुफ्ती रहेमत अली, मौलाना कारी हाफीज जाहीद, मौलाना इब्राहीम, मौलाना कारी रईस, मौलाना शाकीर रजा, मौलाना कारी जुनेद आलम,मौलाना हुसेन, बडी दर्गा हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी, हाजी ईशाद रजवी, एजाज काजी यांच्यासह माजी आरोग्यराज्य मंत्री डॉ. शोभा बच्छाव, महाराष्ट्र  गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, कॉँग्रेसच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, नगरसेवक मुशीर सय्यद, वत्सला खैरे, शरद आहेर, रंजन ठाकरे, केशवअण्णा पाटील, राजू देसले, जगबीरसिंग खालसा, किरण मोहिते आदि राजकिय, सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी हाफीज कारी रईस यांनी धर्मग्रंथ कुराणमधील श्लोक पठण केले. मौलाना महेबुब आलम यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. आभार शहर-ए-खतीब यांनी मानले.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकShajahaani Eidgahशाहजहांनी इदगाहMuslimमुस्लीमNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा