मनमाडला पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 01:20 PM2020-06-26T13:20:50+5:302020-06-26T13:21:20+5:30

मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एकात्मता चौक येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

Protest against Manmadla Padalkar's statement | मनमाडला पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

मनमाडला पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध

Next

मनमाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एकात्मता चौक येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
या वेळी संतप्त कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कैलास पाटील, अमजद पठाण, रईस फारु की, राजेंद्र जाधव, सादिक पठाण, योगेश पाटील, हबीब शेख, प्रकाश बोधक, नाना शिंदे, योगेश शिंदे, विठ्ठल नलवडे, अशोक देवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Protest against Manmadla Padalkar's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक