शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विम्याचे संरक्षण

By admin | Updated: January 3, 2017 01:07 IST

स्थायीची मंजुरी : आठ हजार कर्मचाऱ्यांना होणार लाभ; महापालिका भरणार निम्मी रक्कम

नाशिक : महापालिकेतील सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली. पुणे येथील दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत सदर वैद्यकीय विमा काढला जाणार असून, त्यासाठी लागणाऱ्या प्रीमिअमची निम्मी रक्कम महापालिका स्वत: भरणार आहे.  मागील वर्षी दिवाळीत महापौर अशोक मुर्तडक यांनी मनपा कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान घोषित करतानाच एक लाख रुपयांचा वैद्यकीय विमाही काढण्याचे जाहीर केले होते. सदर विमा रकमेसाठी दोन हजार रुपये वार्षिक प्रीमिअम गृहित धरण्यात आला होता. त्यातील एक हजार रुपये महापालिकेने स्वत: भरण्याची तयारी दर्शविली तर उर्वरित एक हजार रुपये कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानातून कपात करून घेतले जाणार होते. त्यामुळे मनपातील आस्थापनेवरील कायम कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात १३ हजार रुपये सानुग्रह अनुदान रोख स्वरूपात मिळाले. यापूर्वी कामगार कल्याण निधीसाठी दिली जाणारी रक्कम ही विमा प्रीमिअमसाठी वर्ग करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, मनपा शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मानधन आणि रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनाही विमा काढणे बंधनकारक करण्यात आले आणि त्यांच्या सानुग्रह अनुदानातून दोन हजार रुपये कपात करून घेण्याचा निर्णय झाला होता. महापौरांच्या घोषणेनंतर प्रशासनामार्फत वैद्यकीय विम्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली, परंतु दोन वेळेस अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा निविदाप्रक्रिया राबविण्यात आली असता, सात कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यातील पाच कंपन्या पात्र ठरल्या. प्रशासनाने केलेल्या तडजोडीनंतर पुणे येथील दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने प्रति २१५० रुपये प्रीमिअमच्या मोबदल्यात कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय विमा काढण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, सदरचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला असता समितीने त्यास एकमताने मंजुरी दिली. महापालिकेने यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानातून एक हजाराची रक्कम कापून घेतली असून, कामगार कल्याण निधीत एक हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)