कोयता दाखविणाऱ्यास संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:46 IST2018-12-11T00:45:59+5:302018-12-11T00:46:12+5:30
राजीवनगर येथील द्वारकामाई चौकात कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा संशयित आरोपी सागर गोविंद बाविस्कर यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाने अटक केली आहे.

कोयता दाखविणाऱ्यास संशयितास अटक
इंदिरानगर : राजीवनगर येथील द्वारकामाई चौकात कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा संशयित आरोपी सागर गोविंद बाविस्कर यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गुन्हे शोधपथकाचे दत्तात्रेय पाळदे, अखलाक शेख, संदीप लांडे हे गस्तीवर होते. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजीवनगर येथील द्वारकामाई चौकात एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करीत असल्याचे समजले. गस्ती पथकाने तातडीने द्वारकामाई चौक गाठले. तेथे जमलेल्या गर्दीमध्ये एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन ‘मी तुमच्याकडे एकेकाकडे बघून घेईल’ अशी धमकी देत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यास शस्त्रासह ताब्यात घेतले. संशयित सागर गोविंद बाविस्कर (१९, रा.चेतनानगर) यास जमाबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.