झाडांना जाहिरात फलक लावले, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:57 IST2019-03-16T00:55:34+5:302019-03-16T00:57:02+5:30
अनुराधा टॉकीज ते आर्टिलरी सेंटररोडपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर खिळे ठोकून तारा लावून जाहिरातीचे फलक लावत झाडांना इजा पोहचविल्या प्रकरणी संबंधित ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाडांना जाहिरात फलक लावले, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिकरोड : अनुराधा टॉकीज ते आर्टिलरी सेंटररोडपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांवर खिळे ठोकून तारा लावून जाहिरातीचे फलक लावत झाडांना इजा पोहचविल्या प्रकरणी संबंधित ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोडचे मनपा उद्यान निरीक्षक इजाज शेख यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, अनुराधा टॉकीज, आर्टिलरी सेंटररोडमार्गे उपनगर नाक्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना खिळे ठोकून तार लावून जाहिरातीचे फलक लटकविण्यात आले होते. विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी जाहिरातीसाठी वृक्षांवर खिळे ठोकून जाहिरातीचे फलक लावून वृक्षांना इजा पोहचवत मालमत्ता व सार्वजनिक ठिकाणाचे विद्रुपीकरण केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात झाडांवर अनधिकृतपणे खिळे ठोकून जाहिरात फलक लावणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.