शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्तपदाबाबत अटी शिथिल करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: March 14, 2015 00:41 IST

आयुक्तांचे शासनाला पत्र : पालिका अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची शिफारस

नाशिक : महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बाहेरील अधिकाऱ्याची शासनाने नियुक्ती केल्यानंतर आणखी एका रिक्त पदासाठी पालिकेतीलच उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची आणि त्यासाठी शासनाने ठेवलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी करणारे पत्र महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नगरविकास खात्याला पाठविले आहे. नाशिक महापालिकेला ‘ब’ वर्ग मिळाल्यानंतर दोन अतिरिक्त आयुक्तपद निर्माण करण्यात आले आहेत. त्यातील एका पदावर अनिल चव्हाण यांची शासनाने प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे, तर दुसरे पद अद्याप रिक्त आहे. या पदासाठी महापालिकेतीलच पदोन्नतीने उपआयुक्तपदापर्यंत पोहोचलेल्या अधिकाऱ्यास सेवाज्येष्ठतेनुसार संधी मिळावी यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने नगरविकास खात्याकडे मागणी केली आहे. आता खुद्द पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीही पालिकेतील सेवाज्येष्ठतेनुसार उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास अतिरिक्त आयुक्तपदी संधी देण्याची आणि त्यासाठी ठेवलेल्या अटी शिथिल करण्याविषयी नगरविकास खात्याला पत्र पाठविले आहे. शासनाने अतिरिक्त आयुक्तपदासाठी उपआयुक्तपदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव असावा, संबंधित अधिकाऱ्याचे दहा गोपनीय अभिलेखांपैकी नऊ गोपनीय अभिलेख अत्युकृष्ट असावेत आदि अटी टाकलेल्या आहेत; परंतु या अटी पालिकेतील स्थानिक अधिकारी कोणीही पूर्ण करू शकत नसल्याने त्यांना अतिरिक्त आयुक्त या पदापासून वंचित राहावे लागत आहे. एकतर शासनाने अटी शिथिल कराव्यात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना संधी द्यावी अन्यथा लवकरात लवकर प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त आयुक्तपद तातडीने भरावे, अशी मागणी शासनाकडे आयुक्तांनी केली आहे. दरम्यान, आयुक्तांनी शासनाकडे पत्र पाठविताना महापालिकेत रोहिदास बहिरम आणि हरिभाऊ फडोळ हे दोन उपआयुक्त दर्जाचे अधिकारी असल्याचाही उल्लेख आवर्जून केला आहे. (प्रतिनिधी)