शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

‘मॉलिक्युलर लॅब’चा प्रस्ताव मागे पडल्यानेच पुण्यावर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:20 IST

नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे ही नाशिक महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीची नऊ मोठी रु ग्णालय असून, अनेक दवाखाने आणि प्रसूतिगृह आहेत महापालिकेचे नाशिकरोड येथील बिटको रु ग्णालय हे सर्वांत मोठे रु ग्णालय आहे

ठळक मुद्देअन्यथा स्वबळावर सामना शक्यपुरेसे डॉक्टर मनपाच्या कोणत्याही रु ग्णालयात उपलब्ध नाहीत.

नाशिक : कोणत्याही विषाणुमुळे होणारे आजार शोधून काढण्यासाठी सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोग शाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. वस्तुत: नाशिक महापालिकेच्या वतीने मॉलिक्युलर लॅब सुरू करण्याचा निर्णय २०११-१२ मध्ये घेण्यात आला होता. ही लॅब वेळेत सुरू झाली असती तर कोरोनासह अन्य अनेक आजारांचे निदान नाशिक येथेच होऊ शकले असते. आता कोरोनामुळे शासनाकडून खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना मान्यता दिली जात असताना महापालिकेतील वैद्यकीय सेवेची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे ही नाशिक महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालकीची नऊ मोठी रु ग्णालय असून, अनेक दवाखाने आणि प्रसूतिगृह आहेत महापालिकेचे नाशिकरोड येथील बिटको रु ग्णालय हे सर्वांत मोठे रु ग्णालय आहे. या रु ग्णालयात दररोज ५०० ते ७०० नागरिक बाह्यरु ग्ण सेवेचा लाभ घेतात. त्याशिवाय जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन कथडा रु ग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रु ग्णालय, सिडकोतील श्री स्वामी समर्थ रु ग्णालय सिन्नर फाटा येथील रु ग्णालय यातही सामान्य नागरिक उपचारासाठी मोठ्या प्रमाणात जातात. महापालिकेच्या बिटको रु ग्णालयाची क्षमता कमी पडत असल्याने या रु ग्णालयाचे नूतनीकरण करून नवीन सुसज्ज इमारतीची गरज निर्माण झाली. त्यामुळे २००८-०९ मध्ये प्रशासनाने नूतन इमारतीचा प्रस्ताव तयार केला होता. नयना घोलप या महापौर असताना हा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. तो मंजूर झाल्यानंतर या रु ग्णालयाच्या भूमिपूजनासाठी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी केवळ इमारतीचे विस्तारीकरण न करतात या रुग्णालयात मॉलिक्युलर लॅब सुरू करावी, अशी सूचना मांडली होती. त्या आधारे तत्कालीन सभागृहनेते सुधाकर बडगुजर यांनी पाठपुरावा करून प्रशासनाकडून हा प्रस्ताव तयार करून घेतला. सुमारे साडेसात कोटी रु पयांचा हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला होता. महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रस्तावाला पाठविला होता. त्यासाठी मुंबईच्या केईएम रु ग्णालयाच्या तज्ज्ञांची त्यासाठी मदत घेतली होती. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना महापालिकेत सत्तांतर झाले. २०१२ मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आली त्यावेळी विकासाचे प्राधान्यक्र म बदलले आणि मॉलिक्युलर लॅबचा प्रस्ताव मागे पडला.सद्यस्थितीत महापालिकेला डेंग्यू आणि स्वाइन फ्लू तसेच अन्य काही रोगांचे निदान करण्यासाठी रुग्णांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवले लागतात. रोगराईचा काळ असेल तर नमुन्यांचा अहवाल येण्यास विलंब होतो महापालिकेची मॉलिक्युलर लॅब त्यावेळी सुरू झाले असते तर सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांचे निदान नाशिकमध्ये होऊ शकले असते यासाठी पुण्याला प्रयोगशाळेवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसती सध्या कोरोनामुळे अशा प्रकारच्या आरोग्य सुविधांची उणीव प्रामुख्याने जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेने आता तरी दखल घेऊन आरोग्य सुविधांकडे अधिक लक्ष पुरवण्याची गरज आहे.अन्यथा स्वबळावर सामना शक्यबिटको रु ग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम जवळपास पूर्ण असले तरी ही इमारत अद्याप वापरायोग्य झालेली नाही. ६७ कोटी रु पये या इमारतीवर खर्च झाले आहेत. नऊ वर्षांत मनपा एक सुसज्ज रु ग्णालय बांधू शकले नाहीच, पण पुरेसे डॉक्टर मनपाच्या कोणत्याही रु ग्णालयात उपलब्ध नाहीत. योग्यवेळी या सर्व बाबींची पूर्तता केली असती तर या आपत्कालीन स्थितीचा सामना मनपा स्वबळावर करू शकली असती. मात्र, सद्य परिस्थितीत तसे करण्यास मनपाचा आरोग्य विभाग सक्षम आहे का, याविषयी शंका आहे.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस