शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता, पाणीपुरवठा करवाढीचे संकेत

By admin | Updated: April 9, 2017 00:34 IST

नाशिक : महापालिकेची स्थायी समिती अस्तित्वात आल्यानंतर आता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून स्थायीला सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

नाशिक : महापालिकेची स्थायी समिती अस्तित्वात आल्यानंतर आता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून स्थायीला सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा प्रशासनाने घरपट्टी व पाणीपट्टीत प्रत्येकी सुमारे ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केल्याचे समजते. सत्तारूढ भाजपाकडून करवाढीबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात स्थायी समितीवर अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता आहे.यंदा महापालिका निवडणुकीमुळे फेब्रुवारीत अंदाजपत्रक सादर होऊ शकले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मार्च ते जून या चार महिन्यांसाठी लेखानुदान मांडण्याची तयारी केली होती, परंतु त्याला शासन मान्यता न मिळाल्याने प्रशासनाने संपूर्ण आर्थिक वर्षाचेच अंदाजपत्रक तयार केले आहे. सन २०१७-१८ या वर्षाचे अंदाजपत्रक सुमारे १३५० कोटी रुपयांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी १३५७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, परंतु ११५० कोटी रुपयांच्या आसपासच उत्पन्न जमा होऊ शकल्याने आयुक्तांचे अंदाजपत्रकही फोल ठरले. आता उत्पन्नाची जमा बाजू आणि महसुली व भांडवली खर्च लक्षात घेता आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अंदाजपत्रक तयार केले असून, त्यात मालमत्ता व पाणीपुरवठा करवाढीचे संकेत आहेत. प्रामुख्याने, आयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत प्रत्येकी सुमारे ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केल्याचे समजते. प्रशासनाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११६ कोटी रुपये तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ४०.२६ कोटी रुपये ठेवले होते. प्रत्यक्षात घरपट्टी ९० कोटी तर पाणीपट्टी ३० कोटी रुपयेच वसूल होऊ शकली. याशिवाय, एलबीटीपासून मिळणारे उत्पन्न व अनुदानही एकत्रितपणे सुमारे ८१० कोटींच्या आसपास राहिले आहे. त्यामुळे एकूणच उत्पन्नाचा घसरलेला आलेख पाहता यंदाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांकडून इतरही करांमध्ये दरवाढ प्रस्तावित केली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)