दिनेश पाठक
नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पुरेसे पुरावे 'एसआयटी' ने एकत्र केले असून, आता पुढच्या टप्प्यात खरातच्या आर्थिक नाड्या आवळण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यातून खरातचे निर्माण केलेले प्रॉपर्टी रॅकेट देखील तपासले जाणार आहे. १५०० ते २००० कोटींची माया खरातने कशी जमविली? याचा उलगडा होणार असल्याने काही राजकीय मंडळी, शासनातील उच्चपदस्थ अधिकारी, बडे व्यावसायिक, तसेच काही विकासक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
खरातची आर्थिक पाळेमुळे खणून काढण्यासाठी आता 'एसआयटी'च्या स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखेकडे आर्थिक फसवणूक, तसेच एकूणच खरातने जमविलेल्या संपत्तीच्या चौकशीसंदर्भात तपासाची सूत्रे सोपविली जाणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. १० दाखल गुन्ह्यांपैकी लैंगिक शोषण, दोघे फिर्यादींच्या फसवणूक प्रकरणाचा तपास 'एसआयटी'कडेच असेल. शिर्डीत मंगळवारी चार एकर भुखंड बळकावल्या प्रकरणी खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने आहिल्यानगर-नाशिक-पुणे या दरम्यानच्या खरात चालवित असलेल्या प्रॉपर्टी रॅकेटला पुष्टी मिळाली आहे.
आर्थिक तपासाचा पहिला अंक म्हणजे खरातच्या खासगी सीएला एसआयटीने बजावलेले समन्स आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना देखील एसआयटी खरातसोबतचे आर्थिक संबंध या विषयावर प्रश्न विचारू शकते. खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अधिक गडद होत असून, २०१८ मध्ये अवधी चार लाखांची उलाढाल असलेल्या खरातच्या 'शिवनिका ट्रस्ट'ने २०२४ पर्यंत कोटींची झेप घेतल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द; फार्महाऊसवर सापडली २१ काडतुसं, ८ गुन्हे दाखल
हवालामार्गे सुमारे १०० कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आल्याची चर्चा असून, एकूण व्यवहार ३०० कोटींच्या घरात गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घडामोडींमुळे खरात प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले असून, आर्थिक गैरव्यवहार, हवाला रैकेट आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. खरातने महसूलमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे व्यवहार केले आहेत.
"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर
काळा पैसा पांढरा केल्याचा संशय
राजकीय मंडळी, शासनाचे मोठे अधिकारी यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी खरातचा वापर केला गेला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील तसे सूतोवाच केले होते. त्याअनुषंगाने देखील आर्थिक तपासात आहे. उकल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यामुळे वाढली शक्यता
खरातला अटक झाल्यानंतर 'एसआयटी'ने खरातने केलेले लैंगिक शोषण यासंदर्भात भक्कम पुरावे गोळा केले. मात्र, हा तपास करताना एसआटीसमोर खरातच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी अनेक धक्कादायक तपशील बाहेर आले. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने एकावेळेस गुन्ह्याचे अनेक कंगोरे तपासताना पोलिसांच्या आर्थिक पथकाकडून खरातने जमविलेल्या आर्थिक मायाजालाची स्वतंत्र चौकशी केली जाऊ शकते.
Web Summary : Ashok Kharat's property racket, involving ₹1500-2000 crore, is under investigation. Authorities suspect black money was laundered. Political figures and officials may face scrutiny as the SIT delves into financial fraud and asset accumulation, with links to Dubai being probed.
Web Summary : अशोक खरात का संपत्ति रैकेट, जिसमें ₹1500-2000 करोड़ शामिल हैं, जांच के दायरे में है। अधिकारियों को काले धन को वैध बनाने का संदेह है। एसआईटी द्वारा वित्तीय धोखाधड़ी और संपत्ति संचय की जांच करने पर राजनीतिक हस्तियों और अधिकारियों को जांच का सामना करना पड़ सकता है, दुबई से संबंध जांचे जा रहे हैं।