वादातून आई, मुलीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:31 IST2019-03-16T00:02:16+5:302019-03-16T00:31:11+5:30

सुभाषरोड भारती मठ येथे मागील भांडणाच्या कारणावरून आई व मुलीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

From the promise, the girl beat up | वादातून आई, मुलीस मारहाण

वादातून आई, मुलीस मारहाण

नाशिकरोड : सुभाषरोड भारती मठ येथे मागील भांडणाच्या कारणावरून आई व मुलीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाषरोड भारती मठ येथील अलका उत्तम ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गुरुवारी दुपारी मागील पाणी भरण्याच्या कारणावरून कुरापत काढून संशयित विजय गंगाईया कैंदल (४५) रा. भारतीमठ सुभाषरोड याने अलका ढाकणे यांची मुलगी सुनीता मंदाळे हिला शिवीगाळ केली. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या अलका ढाकणे व मुलगी सुनीता यांच्यावर धारदार हत्यारानेवार करून जखमी केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
विद्यार्थिनीचा विनयभंग
औरंगाबाद नाका परिसरातील शिकवणी संपल्यानंतर रिक्षात बसून पंचवटीतील सरस्वतीनगरच्या
दिशेने प्रवास करताना एका ३२ वर्षीय तरुणाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी (१४) घडला आहे.
फिर्यादी विद्यार्थिनी औरंगाबाद नाका परिसरात शिकवणी
झाल्यानंतर रिक्षातून सरस्वतीनगर
येथे घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा रमेश मांगीलाल चव्हाण (३२) याने
विनयभंग केला. संशयित आरोपी
रमेश चव्हाण सध्या पंचवटीतील बळीमंदिर परिसरातील शारदा कॉलनीत राहत असून, त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: From the promise, the girl beat up