समन्वयातून प्रगती साधणे शक्य : पवनकुमार गुंजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:34 IST2019-04-27T00:34:34+5:302019-04-27T00:34:52+5:30
सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले.

समन्वयातून प्रगती साधणे शक्य : पवनकुमार गुंजू
नाशिक : सकारात्मक बदलामुळे महावितरणच्या प्रगतीचा आलेख वाढला असून, परस्पर समन्वयातून प्रगतीला आणखी गती मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे नवनियुक्त मानव संसाधन विभागाचे संचालक पवनकुमार गुंजू यांनी केले.
एकलहरे प्रशिक्षण केंद्रात महावितरणमध्ये कार्यरत संघटना प्रतिनिधींशी संवाद साधताना गंजू बोलत होते. कंपनीशी एकनिष्ठ राहून सकारात्मकतेने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी परिमंडळ कार्यालयात आयोजित बैठकीत मुख्य अभियंता ब्रिजपालिसंह जनवीर आणि सहायक महाव्यवस्थापक प्रवीण बागुल यांनी परिमंडळ ते कक्ष कार्यालय स्तरापर्यंतचे मनुष्यबळ व जबाबदाऱ्या यांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.
यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापुरे, ललित खाडे, कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, सुरेश सवाईराम, मनीष ठाकरे, अनिल थोरात, अभिमन्यू चव्हाण, देवेंद्र सायनेकर, नरेंद्र सोनवणे, प्रशांत लहाने आदी यावेळी उपस्थित होते.
क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ट परिमंडळ, मंडळ, विभाग, उपविभाग आणि कक्ष कार्यालयासोबतच पायाभूत आराखडा, माहिती तंत्रज्ञान, स्काडा, भांडार याशिवाय प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र याठिकाणी चालणाºया दैनंदिन कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.