शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

महानिरीक्षकांचे खासगी काम करणा-या पोलिसांना ‘बक्षिसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 15:01 IST

जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटीसीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचा-यांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच परंतु अशा कर्मचा-यांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देआजारी मुलीची सुश्रृषा : ग्रामीण पोलिसांचा अफलातून शोध कोतवाल, तलाठी, कामाठी, कार्यालयातील शिपायांना नेहमीच वरिष्ठ अधिका-यांच्या घरी व खासगी कार्यालयांमध्ये कामकाज करावे लागत

नाशिक : शासकीय अधिका-यांनी हाताखालच्या कर्मचा-यांना आपली खासगी कामे सांगू नयेत असा दंडक असतानाही त्याचे पालन न करण्याकडे अधिकारी वर्गाचा कल असतो, विशेष करून पोलीस खात्यात तर पोलीस कर्मचा-यांना अधिका-यांच्या बायका-मुलांचेही खासगी कामे करावी लागल्याची अनेक उदाहरणे ताजी असताना त्यात नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांची भर पडली आहे. विनयकुमार चौबे यांची मुलगी आजाराने रूग्णालयात दाखल असताना चौघा पोलिसांनी तिला बरे करण्यात अथक परिश्रम घेतल्याबद्दल महानिरीक्षकांनी पोलीस खात्याच्या निधीतून त्यांच्यावर बक्षिसांची खैरात केल्याची बाब राज्यभर चर्चेत आली आहे.जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटीसीत हा प्रकार उघडकीस आला असून त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचा-यांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच परंतु अशा कर्मचा-यांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे. अर्थात सदरचा प्रकार पोलीस खात्यातच होतो असे नाही तर अन्य शासकीय खात्यांमध्येही असाच प्रकार सुरू असून, कोतवाल, तलाठी, कामाठी, कार्यालयातील शिपायांना नेहमीच वरिष्ठ अधिका-यांच्या घरी व खासगी कार्यालयांमध्ये कामकाज करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. नाशिकच्या एका माजी विभागीय आयुक्तांच्या घरी स्वयंपाकाचे काम करणा-या कोतवाल व महसुल खात्याच्या महिला शिपायांचा आयुक्तांच्या पत्नीकडून होणा-या छळाची उदाहरणे आजही दिली जात आहेत. अशा परिस्थितीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची कन्या जानेवारी महिन्यात आजारी पडल्याने तिला उपचारार्थ  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन,तीन दिवसांच्या उपचारानंतर कन्या बरी झाल्याने तिला घरी सोडण्यात आले. परंतु या काळात नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय निंबा खराटे, आसिफ उमर शेख, पोलीस शिपाई मारूती सटवा पांडलवाड, किरण देवराम नागरे या चौघा कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतल्याचे चौबे यांचे म्हणणे आहे. या चौघा कर्मचा-यांची बक्षिशीची घोषणा करणा-या पोलीस नोटीसमध्ये ‘दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये श्रमदान करीत विशेष मेहनत घेवून जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली’ असे गौरवोद्गार काढण्यात आले असून, त्यापोटी त्यांना प्रत्येकी शंभर रूपये रिवार्ड देण्याची शिफारस करण्यात आली व त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. मुळात चौबे यांच्या कन्येवर दिवसरात्र हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिकांनी उपचार केलेले असताना चौघा कर्मचा-यांनी दिवसरात्र नेमकी काय मेहनत घेतली हे कळू शकलेले नाही.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक