पुरोहित संघ कार्यकारिणी बिनविरोध

By Admin | Updated: January 25, 2016 22:55 IST2016-01-25T22:53:17+5:302016-01-25T22:55:50+5:30

पुरोहित संघ कार्यकारिणी बिनविरोध

Priority committee executive unanimity | पुरोहित संघ कार्यकारिणी बिनविरोध

पुरोहित संघ कार्यकारिणी बिनविरोध

नाशिक : गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाची सर्वसाधारण सभा होऊन यावेळी पुरोहित संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारी मंडळात पुन्हा एकदा सतीश शुक्ल यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, दिलीप शुक्ल यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांची निवड झाली आहे. तर चिटणीसपदी हेमंत तळाजिया, सहचिटणीसपदी अमित गायधनी व खजिनदार म्हणून शेखर शुक्ल यांची निवड झाली आहे. कार्यकारिणीत विलास पराशरे, अलोक गायधनी, वैभव दीक्षित,अमित पंचभय्ये, प्रतीक शुक्ल यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तर उपेंद्र देव, विनय चंद्रात्रे, सदानंद देव यांचा निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला. विश्वस्त मंडळात सतीश शुक्ल, दत्तात्रय भानोसे, मधुकर दीक्षित, चंद्रशेखर गायधनी व विनायक गायधनी यांचा समावेश करण्यात आला असून, शांतारामशास्त्री भानोसे, दिनेशशास्त्री गायधनी व भालचंद्रशास्त्री शौचे यांची पुरोहित संघाचे प्रवक्ते म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Priority committee executive unanimity