भद्रकालीतील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 18:00 IST2018-09-17T17:59:50+5:302018-09-17T18:00:13+5:30

Print on gambling in Bhadrakali | भद्रकालीतील जुगार अड्ड्यावर छापा

भद्रकालीतील जुगार अड्ड्यावर छापा

ठळक मुद्दे५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त

नाशिक : भद्रकालीतील शितळादेवी मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी (दि़१६) छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व ५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या जुगाºयांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शितळादेवी मंदिराजवळ जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित प्रदीप ऊर्फ पिंट्या (रा. महालक्ष्मी चाळ), हरिष पवार, बबली चावरिया व दुलारी दलोड हे चौघे पत्त्यांवर अंदरबाहर नावाचा जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई एजाज पठाण यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Print on gambling in Bhadrakali