सिन्नर : जगभरातील कामाचा ठसा उमटवणाऱ्या अशिक्षित पण कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असलेल्या ‘सीडमदर’ राहीबाई पोपरे यांचा सत्कार खºया अर्थाने त्यांच्या कार्याचा गौरव आहे. गावठी वाणांचे संगोपन आणि जपवणूक करणाºया पोपेरे यांचे कार्य खºया अर्थाने प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात ‘बीबीसी’ने सीडमदर म्हणून गौरवलेल्या राहीबाई पोपेरे यांचा जाहीर नागरी सत्कार मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कलगड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, किसान तालुकाध्यक्ष वामन पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, ए. टी. शिंदे, नामदेव कोतवाल, राजाराम मुरकुटे, कैलास झगडे, माधव आव्हाड, मेधा दराडे, संजय काकड, विष्णूपंत म्हैरधुणे, आदिनाथ शिंदे, निवृत्ती अरिंगळे, डॉ. संदीप शिंदे, संदीप लोंढे आदी उपस्थित होते.
सीडमदर राहीबाई पोपेरे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 17:49 IST