वणीत उन्हाळ कांद्याला १३७० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:07 IST2021-04-13T19:09:08+5:302021-04-14T01:07:01+5:30
वणी : येथील उपबाजारात कांद्याची मंगळवारी ६६०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा ६००० क्विंटल तर लाल कांदा ६०० क्विंटल अशी वर्गवारी आहे. उन्हाळ कांद्याला १३७० रुपये कमाल व ८०० रुपये किमान तर १०५० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.

वणीत उन्हाळ कांद्याला १३७० रुपये दर
वणी : येथील उपबाजारात कांद्याची मंगळवारी ६६०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा ६००० क्विंटल तर लाल कांदा ६०० क्विंटल अशी वर्गवारी आहे. उन्हाळ कांद्याला १३७० रुपये कमाल व ८०० रुपये किमान तर १०५० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला.
लाल कांद्याला ९०० रुपये प्रति क्विंटलचा अधिकतम दर मिळाला. ५०० रुपये किमान तर ७७५ रुपये सरासरी असा दर मिळाला. ३२७ वाहंनामधून कांदा विक्रीसाठी आणण्यात आला होता. कांदा खरेदी-विक्री व्यवहारानंतर उत्पादकांनी पैसे रोख स्वरुपात घेऊन जावेत, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
कोलंबो, दुबई व इतर परदेशीय भागात उन्हाळ कांद्याला मागणी वाढलेली आहे. उन्हाळ कांद्यात टिकवण क्षमता असल्याचे गणित त्यामागे आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात निर्यातीसाठी कंटेनर उपलब्धतेसाठी व्यापारीवर्गाला प्रतीक्षा करावी लागली होती. समुद्रमार्गे केल्या जाणाऱ्या या वाहतुकीची गती व्यावसायिकदृष्ट्या कमी झाली होती. दरम्यान, त्यावेळी कांदा खरेदी विक्री व्यवहारावर परिणाम झाल्याची भावना निर्माण झाली होती. सद्यस्थितीचे अवलोकन केल्यास कांदा खरेदी-विक्री व्यवहारास सकारात्मक वातावरण निर्माण होऊन उत्पादकांना कोरोना कालावधीत समाधानकारक दर मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
मागणीत वाढ
परदेशात व परराज्यात कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात सकारात्मक बदल होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. परदेशात पाठविण्यात येणाऱ्या कांद्यासाठी कंटेनरच्या उपलब्धतेवर गणित अवलंबून असल्याने खरेदी-विक्रीच्या व्यवहार प्रणालीच्या गतीवर त्याचा परिणाम होतो आहे. देशांतर्गत पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब या ठिकाणी नाशिकच्या उन्हाळ कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामानाने लाल कांद्याला मागणी तुलनात्मक कमी असली तरी व्यवहारप्रणाली सुरू आहे.