शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

तस्करी रोखण्यासाठी महाराष्टÑ-गुजरात साथ-साथ ;वनसंरक्षण : जंगलांचा ºहास थांबविणार; सीमेवर संयुक्त गस्त सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:49 IST

अझहर शेख । नाशिक : महाराष्टÑ-गुजरात राज्यात सध्या विकासावरून राजकीय स्पर्धा सुरू आहेच, शिवाय काही बाबतीत सुप्त संघर्ष सुरू ...

ठळक मुद्देतस्करी रोखण्यासाठी महाराष्टÑ-गुजरात साथ-साथवनसंरक्षण : जंगलांचा ºहास थांबविणार; सीमेवर संयुक्त गस्त सुरू

अझहर शेख ।नाशिक : महाराष्टÑ-गुजरात राज्यात सध्या विकासावरून राजकीय स्पर्धा सुरू आहेच, शिवाय काही बाबतीत सुप्त संघर्ष सुरू असताना वनविभाग मात्र एकत्र आले आहेत. सीमेवरील नाशिक वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या जंगलात वाढती घुसखोरी आणि तस्करीकरिता केली जाणारी वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील जिल्ह्यांच्या वनविभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखला आहे.नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील गुजरात सीमेला लागून असलेल्या आदिवासी तालुक्यांमधील जंगलात दिवसेंदिवस तस्करटोळ्या सक्रिय होऊ लागल्याने वनविभागाची झोप उडाली आहे. येथील वृक्षसंपदेला वाचविण्यासाठी नाशिक पूर्व वनविभाग स्थानिकस्तरावर आदिवासींच्या संयुक्त वनव्यवस्थापन समिती गाव-पाड्यांवर गठित करण्यापासून तर ग्रामसभांमध्ये समुपदेशन करण्यापर्यंत विविध प्रयोग राबविण्याचा प्रयत्न करत आहे. याबरोबर वनविभागाने पुढचे पाऊल उचलले आहे. नाशिक जिल्ह्याच्या जवळ असलेल्या सीमेवरील डांग, बलसाड, वापी जिल्ह्यांच्या उत्तर-दक्षिण वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांना संयुक्त बैठकीसाठी उपवनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी निमंत्रित केले होते.गुजरातमध्ये गुटखा व्यवसायासाठी लागणाºया काथाला मोठी बाजारपेठ आहे; मात्र काथ मिळविण्यासाठी खैरचे जंगल नाशिक वनविभागाच्या हद्दीत दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. यामुळे खैर तस्करांच्या टोळ्या सातत्याने घुसखोरी करून गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना लावण्याचा प्रताप करत आहे. सदर समस्या गंभीर होत असल्याचे लक्षात येताच नाशिक पूर्व वनविभाग खडबडून जागे झाले.दोन महिन्यांपूर्वी सुरगाणा तालुक्यातील वनपरिक्षेत्रातून खैराची तस्करी करणारी टोळी नाशिक पूर्व वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाºयांनी रंगेहाथ पकडली होती; मात्र यावेळी या टोळीची पाळेमुळे गुजरातच्या वापीमध्ये रुजल्याचे लक्षात आले. त्यानंतर एका संशयिताला वापीमधून सुरगाणा वनपरिक्षेत्राच्या अधिकाºयांनी ताब्यातघेतले होते.आपापसांत संवादातून माहितीची देवाणघेवाण वनसंपदेवर डोळा ठेवून असलेल्या गुजरातमधील गुन्हेगारांच्या टोळीबाबतची महत्त्वाची माहिती यावेळी बैठकीत नाशिक पूर्व वनविभागाच्या पथकाला पुरविण्यात आली. त्याचप्रमाणे नाशिक वनविभागानेही महत्त्वाचे तस्करीच्या गुन्ह्यातील धागेदोरे मिळविण्याबाबत चर्चा घडवून आणली. यावेळी अधिकारी वर्गाने वनरक्षक, वनपाल यांचे आपापसांत चर्चासत्रही घेतले. यावेळी वनसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजनांची गरज व अंमलबजावणीविषयी एकमेकांमध्ये माहितीचे आदानप्रदान झाले.