शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: January 9, 2017 00:56 IST

घोटी गट : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करण्यासाठी सारेच सरसावले

सुनील शिंदे घोटी
तालुक्याच्या राजकारणाची उलथापालथ करणारे आणि राजकीय केंद्र असलेल्या घोटी गटाचे या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या गटाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी शिवसेनेने बाबूलाल भोर यांच्या रूपाने ताब्यात घेतलेल्या या गटात नंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या गटात प्रचंड मुसंडी मारीत आजपर्यंत हा गट आपल्या ताब्यात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला अबाधित ठेवला आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय जाधव यांच्यानंतर माजी आमदार शिवराम झोले व त्यानंतर अलका जाधव यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले. याचीच दखल घेत या गटातील जिल्हा परिषद सदस्या अलका जाधव यांना जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती होण्याचा मान मिळाला. या संधीचे सोने करीत त्यांनी गटासाठी जिल्हा परिषदेमार्फत विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देत, गटातील ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण केले.
या निवडणुकीतही पारंपरिक राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर महाराष्ट्र नविनर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या प्रमुख पक्षासह अनेक अपक्षांनी या गटात लढण्याची तयारी केली आहे. सर्व इच्छुकांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरु वात केली आहे. यादृष्टीने राजकीय पक्षांनी घोटी शहराला केंद्रस्थानी मानून शहरातच गटाचे आणि गणाच्या आढावा बैठका, कार्यकर्ता मेळावा घेण्यात येत
आहे.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक
तालुक्यातील पाच गटांपैकी घोटी व शिरसाटे या गटात अपेक्षित विकास कामे झाली असतानाही आगामी निवडणूक विकास या एका मुद्द्यावर लढली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गेली पाच वर्षांतील गटात केलेल्या विकास कामाना विविध माध्यम, सोशल मीडिया, माहिती पुस्तिका आदिमार्फत गटातील मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शिवसेनेने घोटी ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेली विकास कामे जनतेसमोर सादर करून मतदाराना विशेषत: घोटी शहरातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, मनसे व भारतीय जनता पक्षही विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
आमदार निर्मला गावित यांनीही गेली सात ते आठ वर्षांपासून तालुक्यात आणलेल्या विकासपर्वाचे या गटातील इच्छुक काँगेस उमेदवार फायदा घेणार आहे.