एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत.
राष्ट्रपती दौरा : ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ मार्गावर ‘बीडीडीएस’कडून कसून तपासणी
ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमबॉम्ब शोधक-नाशक, विशेष गुन्हे श्वान पथकाकडून तपासणी
नाशिक : शासकिय विश्रामगृह तिडके कॉलनी ते थेट द्वारकामार्गे गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलपर्यंतच्या मार्गाची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. मंगळवारी (दि.८) सकाळी या मार्गावर व्हीव्हीआयपी कॅन्वॉयची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली. या संपुर्ण मार्गावर बॉम्ब शोधक-नाशक व विशेष गुन्हे श्वान पथकाकडून कसून तपासणीदेखील करण्यात आली.राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उद्या बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक शहरात मुक्कामी येत आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलला विशेष ध्वज प्रदान करत ‘प्रेसिडेन्ट कलर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच देवळाली येथील स्कूल आॅफ आर्टिलरी येथे एका ‘रूद्रनाथ’ नावाच्या संग्रहालयाचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानिमित्त ते नाशिकच्या दौऱ्यावर बुधवारी सायंकाळी येणार आहे. ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहेत. तेथून गुरूवारी सकाळी (दि.१०) गांधीनगरच्या कॅटस्च्या मैदानावर मुख्य सोेहळा पार पडणार आहे. त्यासाठी ते ‘व्हीव्हीआयपी कॅन्वॉय’ने शासकिय विश्रामगृहावरून रवाना होतील. कॅटस्च्या मैदानावर एव्हिएशनच्या वैमानिकांचा गौरव करत त्यांना मार्गदर्शनपर संदेश देतील. यावेळी एव्हिएशनच्या लष्करी बॅन्ड पथकाच्या धूनवर वैमानिकांची तुकडी संचलन करत तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना देणार आहेत. तसेच आपल्या हवाई कसरतींच्या माध्यमातून कौशल्याचे दर्शनही घडविणार आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून कॅटस्च्या जवानांकडून सराव केला जात आहे. चित्ता, चेतक, ध्रूव आणि रूद्र या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चित्तथरारक हवाई प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत.
Web Title: Presidential Visit: A thorough investigation by 'BDDS' on the 'VVIP canvay' route