राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 15:56 IST2018-10-22T15:55:55+5:302018-10-22T15:56:08+5:30
मांगीतुंगी (नाशिक)- बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन
मांगीतुंगी (नाशिक)- बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित आहेत. संमेलन आयोजक स्वामी रविंद्रकीर्तीजी, महामंत्री संजय पापडीवाल आदींनी राष्टÑपतींचे हेलिपॅडवर स्वागत केले. ऋषभदेवनगरीतून जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील भिलवाड गावाजवळ असलेल्या ‘मांगीतुंगी’च्या पायथ्याशी जैन धर्माचे पहिले तिर्थंकर भगवान श्री ऋषभदेव यांची १०८ फूटी मूर्ती साकारण्यात आली आहे. या तिर्थक्षेत्रावर (ऋषभदेवपूरम) साध्वी प.पू. ज्ञानमती माताजी आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाला प्रारंभ झाला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने कोविंद हे प्रथमच नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत. संपूर्ण विश्वात विशेष महत्त्व प्राप्त असलेल्या या सोहळ्याला जगभरातून भाविक उपस्थित झाले आहेत. ग्रामीण पोलीस दलासह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. दूरवरु न आलेल्या भाविकांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था मांगीतुंगी येथे करण्यात आली आहे. तत्पूर्वी, ‘ऋषभदेव के द्वार राष्टÑपती आज पधारे’ हे विशेष भजन रूपेश जैन यांनी म्हटले.