अध्यक्ष चषक स्पर्धांना आजपासून प्रारंभ शुक्रवारी समारोप

By Admin | Updated: February 11, 2015 00:45 IST2015-02-11T00:43:33+5:302015-02-11T00:45:12+5:30

अध्यक्ष चषक स्पर्धांना आजपासून प्रारंभ शुक्रवारी समारोप

The President concluded on Friday from the start of the tournament | अध्यक्ष चषक स्पर्धांना आजपासून प्रारंभ शुक्रवारी समारोप

अध्यक्ष चषक स्पर्धांना आजपासून प्रारंभ शुक्रवारी समारोप

  नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला-क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उद्यापासून (दि.११) बुधवारी सकाळी नऊ वाजता प्रारंभ होत असून, अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष प्रकाश वडजे हे राहणार असून, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सभापती किरण पंढरीनाथ थोरे, शोभा सुरेश डोखळे, केदा अहेर, उषा शंकर बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड, सदस्य सुनीता पाटील, चंद्रकांत वाघ, कल्पना सूर्यवंशी, बेबी माळी, प्रवीण गायकवाड, माधुरी बोरसे आदि उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांचा समारोप १३ फेब्रुवारीला होणार असून, समारोपासही सर्व पदाधिकारी व अधिकारी, तसेच गटनेते संपतराव सकाळे, प्रवीण जाधव, प्रशांत देवरे, संदीप पाटील, रवींद्र देवरे आदि उपस्थित राहणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: The President concluded on Friday from the start of the tournament