शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कोरोनाच्या लढाईसाठी कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:04 IST

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे पोहोचली असून, त्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावचे आहेत. जिल्ह्यातल ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी, केंद्र सरकारने आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा टप्पा असल्याचे

ठळक मुद्देगावातच होणार उपचार : वसतिगृहे, खासगी रुग्णालये ताब्यातशहरी भागातील लोण ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी आत्तापासूनच खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळता कोरोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी कृती आराखडा तयार केला असून, त्यासाठी कोरोना सदृश रुग्ण आढळल्यास त्याच्यावर गावातच उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेआठ हजार संभाव्य रुग्ण या सेंटरमध्ये दाखल होण्याची शक्यता गृहीत धरून प्रत्येक गावातील शाळा, वसतिगृह व खासगी रुग्णालये त्यासाठी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. प्रायोगिक पातळीवर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे पोहोचली असून, त्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावचे आहेत. जिल्ह्यातल ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी, केंद्र सरकारने आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा टप्पा असल्याचे कळविले आहे. त्यामुळे शहरी भागातील लोण ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी आत्तापासूनच खबरदारी घेण्यात आली आहे. महापालिका, नगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची जबाबदारी घटना व्यवस्थापक म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्याची उपलब्ध असलेली साधनसामुग्री, मनुष्यबळ, औषधांचा साठा लक्षात घेता बनसोड यांनी तीन टप्प्यात कोरोनाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. प्राथमिक पातळीवर प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५६ गावांची निवडही करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये गावातील कोणत्याही व्यक्तीस कोरोनासदृश आजाराचे लक्षण दिसल्यास त्याच ठिकाणी वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार असून, येथेच त्याचा स्वॅब घेण्यात येऊन तो तपासणीसाठी पुढे पाठविला जाणार आहे. रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्याला एक तर होम क्वारंटाइन किंवा इन्स्टिट्यूट क्वारंटाइन केले जाईल. त्यावर पुढील चौदा दिवस देखरेख ठेवण्यात येईल. मात्र अहवाल पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला याच केअर सेंटरमध्ये स्वतंत्र ठेवण्यात येणार आहे. या केअर सेंटरसाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, याशिवाय जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, महापालिकेच्या अख्यत्यारितील आरोग्य सेवाही दिमतीला ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड केअर सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात आठ हजार ४७० रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी दिली.चौकट===हेल्थ सेंटर, हॉस्पिटलची सोयदुसºया टप्प्यात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून, त्यात कोरोनाबाधित, परंतु प्रकृतीला फारसा धोका नसलेल्या रुग्णाला वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. यासाठी नाशिक व मालेगाव महापालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीत असलेल्या खासगी व शासकीय दवाखाने तयार ठेवण्यात आली आहे. जवळपास डेडिकेटेड हेल्थ सेंटरसाठी ७७ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, एकाच वेळी साडेतीन हजार रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्याची सोय आहे, त्यानंतर मात्र शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा पर्याय शिल्लक ठेवण्यात आला आहे. त्यात नाशिक व मालेगाव महापालिकेतील २६ रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद