सलून व्यावसायिक जेलभरोच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:19 PM2020-06-14T18:19:45+5:302020-06-14T18:20:55+5:30

नाशिक: राज्यात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असून त्यांचे अर्थचक्र सुरू झालेले आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेल्या सलून व्यावसायिकांना अद्यापही परवानगी देण्यात आली नसल्यामुळे सलून व्यावसायिक येत्या १८ रोजी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे महाराष्टÑ राज्य सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय पंडीत यांनी सांगितले.

In preparation for the salon professional prison | सलून व्यावसायिक जेलभरोच्या तयारीत

सलून व्यावसायिक जेलभरोच्या तयारीत

Next

नाशिक: राज्यात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असून त्यांचे अर्थचक्र सुरू झालेले आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेल्या सलून व्यावसायिकांना अद्यापही परवानगी देण्यात आली नसल्यामुळे सलून व्यावसायिक येत्या १८ रोजी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट राज्य सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय पंडीत यांनी सांगितले.
सलून व्यावसाय सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आलेली आहे. व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने त्यांना अर्थसहाय्य तसेच आरोग्य विमा काढण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सरकारकडून कोणत्याही मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सलून व्यावसायिकांनी काळ्या फिती बांधून शासनाचे लक्ष देखील वेधले होते. मात्र अजूहनी सलून व्यावसायिकांच्या मागण्यांकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप पंडीत यांनी केला आहे.
राज्यातील मुख्यमंत्री, विरोदी पक्षनेत्यांसह आमदार, खासदार, मंत्र्यांना सलून व्यावसायिकांसदर्भातील पत्र देण्यात आलेले आहे. येत्या १७ रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाने सलून व्यावसायिकांच्या विषयावर कोणताही निर्णय न घेतल्यास १८ तारखेला सकाळी११ वाजता राष्टय नाभिक महासंघ, महराष्टÑ राज्य सलून असोसिएशन व सलून व्यावसयाशी संबंधित अनेक संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते राज्यव्यापी जेलभरो आंदोलना सहभागी होणार असल्याचे पंडीत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: In preparation for the salon professional prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.