शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

’बुस्टर डोस’साठी काळजी घेण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:17 IST

नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना ...

नाशिक : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोसबाबत अधिक लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. सर्वजण वेळेत आणि वेळापत्रकाप्रमाणे डोस घेतील याबाबतची दक्षता देखील घेण्याचे आावाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी लसीकरणाच्या पहिल्या डोसचा आढावा, तसेच दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे सव्हर्लन्स मेडिकल ऑफिसर डॉ. प्रकाश नांदापुरकर, आदी उपस्थित होते.

गेल्या १६ जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या आरेाग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील अजूनही ज्या अधिकारी कर्मचारी यांनी लस घेतली नाही, त्यांनादेखील लस घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी मांढरे यांनी लसीकरण मोहिमेचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले. पुढच्या काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या संदर्भातील नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. नोडल अधिकाऱ्यांनी पूर्वतयारीबाबतची प्राथमिक माहिती सादर केली.

दरम्यान, झालेल्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये ज्या सुधारणा करणे अपेक्षित आहे त्याबाबतची सुधारणा पुढील टप्प्यात करण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असेही मांढरे यांनी सांगितले.

आजपर्यंत साधारण ४१ हजार ८०७ लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.