शिलापूर येथे मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:36 AM2018-04-01T01:36:20+5:302018-04-01T01:36:20+5:30

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील शिलापूर येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात पार पडली.  मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ह.भ.प. ज्येष्ठ रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिरामध्ये श्री हनुमान, श्री गणपती, श्री विठ्ठल-रखूमाई, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.

 Pranaprishtha ceremony in Maruti temple at Shilapur | शिलापूर येथे मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

शिलापूर येथे मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

googlenewsNext

एकलहरे : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील शिलापूर येथील मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात पार पडली.  मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ह.भ.प. ज्येष्ठ रामनाथ महाराज शिलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून उभारलेल्या मंदिरामध्ये श्री हनुमान, श्री गणपती, श्री विठ्ठल-रखूमाई, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.  दुसऱ्या दिवशी शांतीसुक्त स्थापित देवस्थापना, अभिषेक प्रधान देवता हवन करून मूर्तीस अष्टोत्तरात कुंभात्म स्थापना विधी व लोकपाल हवन करून तत्त्वज्ञास मूर्ती धान्यनिवास विधी केला. तिसºया दिवशी शांतीसुक्त पठण, स्थापना मंडळ, देवतापूजन, उत्तरांग हवन, विशेष हवन, बलिदान, पूजा यज्ञ, पूजाविधी करून हनुमान, गणपती, विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली. या धार्मिक विधीसाठी आचार्य भूषण वैद्य, मंगेश जोशी, बाळू नाचण, अभय जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त मांडव डहाळे, मंडपाचे पूजन करून कलश व ध्वजाची शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर वेदपठण, गणेशपूजन, पुण्याहवाचन,मातृकापूजन, नांदीश्राद्ध विधी, वास्तू मंडळपूजन, योगिनीपूजन, क्षेत्रपाल, भैरव मंडपपूजन, अग्निस्थापना करून नवग्रह, महारुद्राचे पूजन व हवन करून सर्व मूर्तीस जलाधिवास संस्कार पूजा व आरती करण्यात आली.

Web Title:  Pranaprishtha ceremony in Maruti temple at Shilapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक